नाशिक: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांत देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र, भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेल्या उमेदवाराला तब्बल 12 हजार एवढी मते मिळाली आहेत. यामुळे भास्कर भगरे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाबू सदू भगरे चक्क 12 हजार 389 मते
नाशिकमधील दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे चौथ्या फेरी अखेर 6 हजार 989 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, आडनाव सारखे असलेले उमेदवार बाबू सदू भगरे सरांना चक्क 12389 मते मिळाली आहेत. एकच आडनाव सलेल्या उमेदवारामुळे वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. निकलाअंती महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे.