नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये लाँच केले जात आहेत. त्याचे फिचर्सही विशेष असे देण्यात येत आहे. त्यातच आता प्रसिद्ध कंपनी Motorola ने आपला नवीन Moto G04s हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
Moto G04s फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंच HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येईल. यासह, वेग आणि मल्टीटास्किंगसाठी युनिसॉक टी 606 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU वापरण्यात आला आहे. Moto G04s स्मार्टफोन Android 14 या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 4GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 8GB पर्यंत वाढवता येते.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP चा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 MP फ्रंट कॅमेरा देखील दिला गेला आहे. याशिवाय, हा फोन 5000 mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येईल. Moto G04s ची किंमत 6999 रुपये असून, या फोनची विक्री पुढील महिन्यात 5 जून रोजी फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.