बारामती, (पुणे) : येथील विवाहित महिलेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 29) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बारामती शहर परिसरातील सहयोग सोसायटीमध्ये ही घटना घडली. स्नेहा संदीप मेंनसे (वय – 50, रा. सहयोग सोसायटी, बारामती शहर, बारामती) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बारामती येथील मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सरदेसाई यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा मेंनसे या सहयोग सोसायटी परिसरात मुलासह राहत होत्या. मंगळवारी (ता. 28) स्नेहा संदीप मेंनसे व त्यांचा मुलगा अजिंक्य मेणसे (वय – 28) हे दोघेजण रात्री घरीच होते. पहाटे साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मुलाच्या निदर्शानास आले. घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा हा घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, शवविच्छेदन केले असता सदरचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे करत आहेत.