मुंबई : सध्या गुंतवणूकदारांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढताना दिसत आहे. त्यानुसार, शेअर मार्केटमध्ये चढउतार होताना दिसत आहेत. त्यातच आता भारतीय शेअर मार्केटमध्ये बुधवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
शेअर मार्केटमध्ये सकाळपासूनच घसरण दिसून आली. सेन्सेक्स 75 हजारांच्या खाली गेला आणि 74,826 च्या पातळीवर उघडला. निफ्टीही 125.40 अंकांच्या घसरणीसह 22,762 वर उघडला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स 658.50 अंकांनी कोसळून 74,511.95 वर तर निफ्टी 182.35 अंकांनी घसरून 22,705.80 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 1.83 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कोटक महिंद्रा बँक, हिरो मोटो कॉर्प, एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स घसरले. बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत पेट्रोलियम, अदानी पोर्ट्स आणि यूपीएल या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया, एसबीआय आणि इंडसइंड बँक सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नफा मिळवणारे होते.