उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीचा विषारी किटकनाशक औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कंचन वृदावन सोसायटी, कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे ही घटना घडली आहे.
प्रशांत बापुसाहेब मानमोडे (वय 38, रा. कांचन वृदावन सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू किरण बापुसो मानमोडे (वय 36 वर्षे धंदा नोकरी, रा. कोरेगाव मुळ, कंचन वृदावन सोसायटी, मुळ रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास किरण मानमोडे हे घरी असताना घराशेजारी राहणारे किरण धर्माधिकारी यांनी त्यांना फोन करत सांगितले की, तुमचे बंधू प्रंशात दारुच्या नशेत मी विष पिणार आहे, असे बोलत आहेत. त्यानंतर किरण यांनी एका तासाने घरी जाऊन बंधू प्रशांत याला ‘तू विषारी औषध पिला आहेस का? अशी विचारणा केली. यावेळी तो नाही म्हणाला. त्यानंतर त्या ठिकाणावरून ते राहत्या घरी निघून गेले.
मंगळवारी (ता. २८) सकाळी प्रशांत याला उठता व बसता येत नसल्याने त्याला तुला काय त्रास होत आहे असे विचारले असता, तो म्हणाला मी किटकनाशक औषध पिले आहे. त्यानंतर त्याला तत्काळ उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नातेवाईक व घरातील लोकांना घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
दरम्यान, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्रशांत यांचे निधन झाले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक मत्रे करीत आहेत.