पुणे : येथील पुणे सोलापूर महामार्गावर आज मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या टॅंकर- इर्टिगाच्या धडकेत सहा जण जखमी झालेल्यांची घटना घडली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालक्यातील खडकी येथे महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणा-या टॅंकरला भरधाव येणारी इर्टिगा गाडी पाठीमागून धडक दिली आहे. यामुळे सहा जण जखमी झालेत. यावेळी अपघातात इर्टिगाच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात झाडांना पाणी घालणा-या टॅंकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले आहे. दौंड तालुक्यातील खडकी येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाजवळ पुणे- सोलापूर महामार्गावर दुभाजकामधील झाडांना पाणी घालणा-या टॅंकरला इर्टिगा गाडी (एम एच 14, एलबी 7071) पाठीमागून धडकली. ही गाडी सोलापूरकडून पुण्याकडे जात होती. या अपघातात इर्टिगा गाडीचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून त्यामधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची नावे अद्यापही समजू शकली नाहीत.
यावेळी अपघातात जखमी झालेल्यांना भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर माहिती देऊनही महामार्गाची रुग्णवाहिका व संबंधित कर्मचारी एक तास उलटूनही घटनास्थळी आले नव्हते. याबाबतही ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली. झाडांना पाणी घालत असता टॅंकर पासून काही अंतरावर रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. या रिफ्लेक्टरमुळे पाठीमागून येणा-या वाहनांना पुढे वाहन असल्याचे लक्षात येते. त्यामुळे अपघात टाळता येऊ शकते.