लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एंजेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने (इंग्रजी माध्यम) सलग 26 वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा जपत यंदाही इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे, अशी माहिती प्राचार्या शमशाद कोतवाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 176 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत अथर्वराज संजय काळभोर याने 94 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मौली संदिप गुप्ता याने 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर रोहन सिदराम भोसले 91.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थी दिव्यांका किशोर काळभोर हिने 91.20 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर आर्या अशोक कुंजीर हिने 91 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान, ओम एज्युकेशन सोसायटी संचालित एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हि शैक्षणिक संस्था लोणी काळभोरमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. हि संस्था इंग्रजी माध्यमाची असून येथे इयत्ता बालवाडी ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेनी 100 टक्के निकाल लावण्याची सलग 26 व्यांदा यशस्वी परंपरा जपली आहे.
संस्थेच्या पदाधिका-यांनी केले विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन
दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे एंजल ग्रुप ऑफ स्कुलचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेच्या संचालिका परवीन इराणी, संस्थेचे संचालक अविनाश सेलूकर, एंजल इंग्लिश मिडीयम हायस्कूल च्या प्राचार्या शमशाद कोतवाल, प्राचार्या खुशबू सिंग, उप प्राचार्या झिमली लोध, मुख्य व्यवस्थापक खानसाहेब शेख, एंजल हायस्कूल विभाग प्रमुख निलेश अडसूळ यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.