आपलं सौंदर्य खुलून दिसावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यासाठी काहीना काहीतरी नवीन पण हटके केले जाते. त्यात केसांना कलर करण्याची जणू एकप्रकारची फॅशनच झाली आहे. मात्र, केसांना नैसर्गिक कलर व्यतिरिक्त इतर रासायनिक कलर करणे हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे हे केस कलर करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत…
ज्यांचे केस नंतर कलर होतात, त्यांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये केसांमधील दाटपणा जाऊन केस गळण्याची समस्याही उद्भवू शकते. त्यात केस लवकर पांढरे होण्याची भीती देखील असते. केसांच्या कलरमध्ये जास्त प्रमाणात अमोनिया मिसळणे हेदेखील केसांसाठी हानिकारक ठरू शकते. केस कलर करण्यापूर्वी आपण ऍलर्जीची काळजी घेतली पाहिजे. कारण कधीकधी काही कलर आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
काही लोक डाय देखील करतात. डायचे कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्ती किंवा व्यावसायिकाकडून कलर करावेत. केसांना कलर करण्यापूर्वी प्रथम ते धुवावेत. वेगळे करावेत आणि वाळवावेत. त्यानंतर कंगव्याच्या एका टोकाने केसांना कलर करावे. यासाठी तुम्ही हेअर एक्सपर्ट किंवा ब्युटी पार्लरचा सल्ला देखील घेऊ शकता.