इंदापूर : शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला. सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान शासकीय वाहनातून (क्र. MH 42 AX 1661) आपल्या कार्यालयाकडे जात होते. तेव्हा संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मल्हारी मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला. यावेळी गाडीमध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत.
दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच उडाली खळबळ उडाली आहे.