मुंबई : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि अंतिम टप्पा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवार, २७ मे रोजी मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे होत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक कामाची चर्चा अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीला पक्षाचे मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, विविध आघाड्यांचे राज्य प्रमुख, प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला आणि बुक आघाडी जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष, समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनी गुरुवारी दिली