नंदुरबारः शहादा तालुक्यातील मलोणी येथे भराव करु नका, असे सांगितल्याच्या रागातून एकास दगडाने मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील मलोणी येथील जुबेरखान रेहमोद्दीन पिंजारी यांनी रियाज अहमद पिंजारी यांना सदर जागेवर भराव करु नका, असे सांगितले.
याचा राग आल्याने जुबेरखान रेहमोद्दीन पिंजारी यांना रियाज अहमद पिंजारी याने अंगणात पडलेला दगड मारुन डोक्याला मारुन दुखापत केली. तसेच अहमद पिंजारी याने शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जुबेरखान रेहमोद्दीन पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. किरण पावरा करीत आहेत.