पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 75 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
– वेतन / मानधन : दरमहा 75 हजार रुपये.
– वयोमर्यादा : 55 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 30 मे 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.