सोलापूर : जिल्ह्यातील उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान प्रवाशी बोट उलटली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सहा जणांचा पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समजली होती. त्यानंतर एनडीआरएफ टीम आणि प्रशासनाने बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरु केलं.
यानंतर आज बुधवारी सकाळपासून उजनी जलाशयात पुन्हा शोध मोहिम राबवण्यात आली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. बुडालेली बोट 35 फूट पाण्यात तळाशी सापडली आहे. मात्र, बुडालेल्या सहा व्यक्तींचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या घटने दरम्यान माढा खासदार रणजित निंबाळकर हे स्वत: NDRF टीम सोबत जलाशयात सर्च ऑपरेशनसाठी उतरले आहेत.
या घटनेतील पाण्यात बुडालेली बोट जवळपास 18 तासानंतर सापडली आहे. त्यात एकूण सहाजण होते असे सांगण्यात आले आहे. बोटीतील सगळ्या प्रवाशांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतदेह अद्याप हाती लागले नाहीत. त्यामुळे अजुनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.