पुणे : बीड लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्याकडून बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरुन व्हायरल होत आहे.
बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा #परळी_पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. #पंकजा_ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे #बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल.
महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून?… pic.twitter.com/Q54UdsZI34
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2024
व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी लिहिले की, काही नागरिक भारतीय जनता पक्षाकडून बुथ ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करताना दिसत आहेत. बुथ ताब्यात घेऊन मतदान करण्याचा हा नवा पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजा ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल, असा टोला रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक_आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.