मुंबई : शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
संबंधित महिला कार्यकर्त्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचा अयोध्या पौळ यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवरही पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. लोकांना पराभव समोर दिसत असल्यानं हा हल्ला केला, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
तसेच काही महिला घरात घुसल्या आणि त्यांनी मला मारहाण करून माझा मोबाईल हिसकावून गेल्या आहेत. तसेच त्यांनी शिवीगाळ केली. मला मारहाण झाली. मला काही झालं तर त्याला यामिनी जाधव जबाबदार आहेत, असा आरोपही अयोध्या पौळ केला.