पुणे : पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जून महिन्यापासून जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जुन्या टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन टर्मिनलला जोडले जाणार आहे. परिणामी लोहगाव विमानतळाची प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन विमानतळाच्या नवीन
टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च महिन्यात झाले होते. त्यानंतर विमान कंपन्यांचे साहित्य नवीन टर्मिनलमध्ये हलविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी नागरी सुरक्षा उड्डाण ब्यूरोकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. तसेच, सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. परवानगी आणि जवान मिळाल्यानंतर नवीन टर्मिनल सुरू केले जाणार आहे. त्यामुळे नवीन टर्मिनल आता जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर जुन्या टर्मिनलच्या विकासा कामाला सुरुवात करणार येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नवीन व जुनी इमारत जोडली जाणार आहे.