पुणे : शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन भोसले हे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावेळी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. थेरगाव येथील बारणे शाळेत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भोसले हे नागु बारणे प्रशालेच्या मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले असता बाहेरुन त्यांनी मोबाईल मागवून घेऊन मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावलेले आहे याबाबतचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.
तसेच त्यांनी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिका-यांशी उद्धट वर्तन करुन त्यांना शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणल्याकारणाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर केले.