पुणे : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. यात महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जिल्ह्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघांत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यातील सहा लढती अतिशय चुरशीच्या मानल्या जात आहेत. बीड, पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे राज्यासह देशभरात पार पडले आहेत.
महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुण्यासह महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये निवडणूक पार पडते आहे तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सातपासून सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले आहे.
एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
जळगाव- 6.14 टक्के
जालना – 6.88 टक्के
नंदुरबार – 8.43 टक्के
शिरूर- 4.97 टक्के
अहमदनगर- 5.13 टक्के
औरंगाबाद – 7.25 टक्के
बीड – 6.72 टक्के
मावळ -5.38 टक्के
पुणे – 6.61 टक्के
रावेर – 7.14 टक्के
शिर्डी – 6.83 टक्के