पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आयकर विभाग, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
आयकर विभाग, पुणे येथे वकील या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी 11 मे पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 24 मे ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वकील.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 मे 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयकर मुख्य आयुक्त, पुणे आयकर भवन, 12, साधू वासवानी रोड, पुणे-411001.
– अर्ज करण्याचा ई- मेल आयडी : pune.ccit@incometax.gov.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://incometaxindia.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.