यवत: पाटस येथील वसंत विनायकराव साळुंखे यांची शिवसंग्राम संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून याबाबतचे पत्र संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या हस्ते देण्यात आले. वसंत साळुंखे यांनी मराठा आरक्षण आंदोलन भाग घेतला होता. दौंड तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा रस्तारोको, अमर उपोषण केले असून याची दखल घेऊन जय शिवसंग्राम संघटनेने प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
लोकनेते विनायकराव मेटे यांचे विचार आणि धेय्य धोरणे तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब वंचित समाजापर्यंत पोहचवून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढे काम करणार आहे. त्यांना समाजांमध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे वसंत साळुंखे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगितले.