अयोध्या : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) जोरदार तयारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता सात मे रोजी तिस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तिस-या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अयोध्येमध्ये (Ayodhya) जाऊन सायंकाळी सात वाजता रामललाचे ( Ramlala) दर्शन घेणार आहेत.
अयोध्येमध्ये पोहोचल्यावर PM मोदी हे राम मंदिरात रामललाचे दर्शन करुन त्यांच्या हस्ते पूजा ही केली जाणार आहे. यानंतर मोदी फैजाबाद (Faizabad) लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लल्लू सिंह (Lallu Singh) यांच्या समर्थनार्थ अयोध्येतील सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक असा जवळपास दोन किलोमीटरचा रोड शो करणार आहे.
फैजाबादमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप PM मोदींच्या अयोध्या दौ-याला खास बनवण्याच्या तयारीत आहे.