नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १० प्रवाशी जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर बस मधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
ही घटना चांदवडच्या राहुड घाटात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. बसचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, एसटी बसची एक बाजू पूर्णपणे कापली आहे. तर मृतदेह रस्त्यावर अस्थाव्यस्थ अवस्थेत पडले आहेत. सुमारे १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतामध्ये लहान मुलांचा समावेश असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.