सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. या काळात फॅन, कुलर आणि एसी वापरण्याला विशेष प्राधान्य दिले जाते. कारण, यातून येणारी थंड हवा खरंच शरीरासाठी गारवा निर्माण करते. पण आपण वापरत असलेल्या एसीमधून जर थंडगार हवा येत नसेल तर तुम्हाला मेकॅनिकला बोलवण्याची गरज नाही. कारण, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरातील एसी नीट करू शकता.
तुमच्या एअर कंडिशनरच्या अनेक समस्या थेट एसी मोटरशी संबंधित असू शकतात. एअर कंडिशनर युनिटमध्ये, मोटरसह, पंख्याचे फिरणे आणि वेग निश्चित केला जातो. अशा परिस्थितीत, नवीन हंगामात कूलिंग नसल्यास एसी मोटर दुरुस्त करून घ्यावी. तसेच एसीच्या तापमानामध्ये जर सतत बदल केला तर थर्मोस्टॅटमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
तुमचा एसी कोणत्या तापमानाला चालेल हे थर्मोस्टॅट सेटिंग्ज ठरवतात. काही कारणास्तव एसी नीट थंड होत नसेल, तर त्याची थर्मोस्टॅट सेटिंग तपासा आणि तापमान तुमच्या गरजेनुसार सेट केले आहे की नाही ते ठरवा. यानंतर खोलीचे तापमान तपासा. विशेषत: एसी बराच काळ बंद राहिल्यास आणि त्याची योग्य देखभाल केली नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच कंडेन्सर कॉईलमधील समस्या दूर केली तर, कूलिंग योग्यरित्या पूर्ववत सुरू होईल.