पुणे : विवाहाचे आमिष दाखवून मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोथरूड येथून उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.
अमोल आनंद मान (वय २९, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमोल आणि पिडीत तरुणीची मैत्री होती. अमोलने नवीन मोटार घेतली होती. मोटारीचे हप्ते भरण्यासाठी त्याने पीडितेकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये घेतले. त्यांतर अमोलने पिडीत तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले. आणि तिला जाळ्यात ओढून अमोलने तिच्यावर बलात्कार केला. पिडीत तरुणीने विवाहाबाबत अमोलकडे विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.