नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका सुरु असताना काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली ( Arvinder Singh Lovely ) यांनी पदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दिपक बाबरीया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणालेत की, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात होता. त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिली आहे.
तसेच अरविंदर सिंग लवली यांनी स्वत: ला दिल्ली पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसचे आभार व्यक्ती केले. गेल्या सात- आठ महिन्यांमध्ये दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, जेणेकरुन पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा, तसेच मी जड अंतकरनाने पत्र लिहित आहे. मी या पक्षामध्ये स्वत:ला लाचार समजत आहे. मी आता दिल्लीच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाही, असे अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.