सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या उष्णतेपासून दूर राहण्यासाठी काहीना काही प्रयत्न केले जातात. विशेषत: आरोग्याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे याच काळात पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याने आरोग्य सुदृढ राहते.
उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा नक्की खाव्यात. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. डायरिया, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून प्यायल्यास आराम मिळतो. यामध्ये भरपूर फायबर असते. शेंगामध्ये व्हिटॅमिन के, प्रथिने, लोह, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे पोषक असतात. तसेच
काकडीही फायदेशीर असते. काकडी सलाड म्हणूनही खाऊ शकता. त्यात भरपूर पाणी असते. यामुळेच या हंगामामध्ये काकडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. त्यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असते आणि त्यात जवळपास 90 टक्के पाणीदेखील असते.
याशिवाय, दुधी भोपळा पोषकतत्त्वांचा खजिना मानला जातो. उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी खूप फायदेशीर असते. यामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याचा आहारात समावेश केल्याने पोटाशी संबंधित समस्या, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.