Pune Viral Video : आर्थिक कारणांमुळे काहीजण नोकरी सोडू शकत नाहीत. अशा स्थितीत पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मिडीयावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. त्या व्हिडिओमधील तरुणाने त्याच्या ‘टॉक्सिक नोकरीच्या (Toxic work) शेवटच्या दिवशी असे काही केले की, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने नोकरीच्या शेवटच्या दिवशी ढोल वाजवत बॉससमोर डान्स केला आहे.
व्हिडिओमधील मुलाचे नाव अनिकेत आहे. अनिकेत तीन वर्षांपासून एका कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ न मिळाल्याने तो निराश झाला. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये अनिकेत आणि त्याचे मित्र ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसताहेत, तर अनिकेतचा बॉस त्यांना रागाने “बाहेर जा” असे सांगत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनिकेतच्या मित्राने सांगितले की, तीन वर्षांत अनिकेतला त्याच्या बॉसकडून कोणताही सन्मान मिळालेला नाही.
काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
यावेळी एका यूजरने लिहिले की, “मला माहित नाही का, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटले.” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, “या डान्समुळे मला एक वेगळेच समाधान मिळाले आहे.