पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट परीक्षा एकाच दिवशी म्हणजे १६ जून रोजी होणार आहेत. यामुळे परीक्षार्थीना एका परीक्षेस मुकावे लागणार आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरवर्षी यूपीएससी आणि नेट या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येते. यंदा देखील वेळापत्रक जाहीर झाल्यावर निवडणुकांमुळे वेळापत्रकातील तारखांमध्ये बदल करावे लागले आहेत. या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या केलेल्या नियोजनावरही झाला आहे. परंतु आता यूपीएससी आणि यूजीसी नेट रोजी होणार आहेत. यामुळे जर यातील दोन्ही पैकी एका परीक्षेच्या तारखेत बदल न केल्यास तरुणांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात नेट परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता करतात. नेटसाठी आणि यूपीएससी असे दोन्ही परीक्षांसाठी केलेले अनेक विद्यार्थी आहेत. यूपीएससीसाठीचे नियोजनही विद्यार्थी कठोर पद्धतीने करतात. कारण त्यातील संधी मर्यादित असल्याने त्यांना काळजीपूर्वक परीक्षा द्यावी लागते. यंदा यूपीएससीच्या वतीने आयएएसच्या १८० तर आयपीएसच्या १५० जागांसह १०५६ रिक्त जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर यूजीसी नेट सहा वर्षानंतर पुन्हा ऑफलाइन पद्धतीने होत आहे. यात जेआरएफ, नेट आणि पीएच.डी अशा तीन विभागांत निकाल जाहीर होणार आहे. यामुळे विद्याथ्यांनी या परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी केली आहे. ज्यामुळे बदल झाल्यास येतील. असे विद्यार्थ्यांनी म्हटले