सांगली: शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता प्रचार पदयात्रा काढल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात कोणतीही पूर्व परवानगी प्रचार फेरी काढली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर त्यांच्या दोन ते तीन समर्थक कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत खटाव आणि बेडग गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेऊन चंद्रहार पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. या गोष्टीमुळे चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे हा सदर गुन्हा दाखल झाला आहे.