SRH vs RCB: हैदराबाद: नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ही धावसंख्या गाठण्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकीकडे विराटने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर पाटीदारने 20 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 50 धावांची तुफानी खेळी केली. या डावात विराट कोहली आणि जयदेव उनाडकट यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी होती. उनाडकटने हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी करत एकूण 3 बळी घेतले. आता हैदराबादला विजयासाठी 207 धावा कराव्या लागतील.
चौथे षटक संपण्यापूर्वीच विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाची धावसंख्या ४८ धावांवर नेल्याने आरसीबीसाठी ही चांगली सुरुवात होती. डु प्लेसिस 48 धावांवर बाद झाला, त्याने 12 चेंडूत 25 धावा केल्या. केवळ 6 धावा करून बाद झालेल्या विल जॅकला काही विशेष करून दाखवता आले नाही. 15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा होती, पण येथून कॅमेरून ग्रीनचे वादळ आले. पुढच्या 3 षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी 37 धावा दिल्या, त्यामुळे बेंगळुरू संघाने 18 षटकांत 179 धावा केल्या होत्या.
शेवटच्या 2 षटकांमध्येही आरसीबीचे फलंदाज आक्रमकपणे बॅटिंग करताना दिसले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने 19व्या षटकात 15 धावा दिल्या, तर टी नटराजननेही शेवटच्या षटकात 12 धावा दिल्या. यासह 200 धावांचा टप्पा पार करण्यात आरसीबी संघाला यश आले.