सलग सुट्ट्या लागल्या की अनेकांचा कुठंतरी फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. पण कुठं जावं हे समजत नसतं. महाराष्ट्रात अशी काही पर्यटनस्थळे आहेत तिथं जाऊन एकदा बघाच. महाराष्ट्रात एक-दोन नाहीतर असंख्य अशी पर्यटनस्थळे आहेत. त्यात साताऱ्यातील कास पठार, कोयना अभयारण्य, अजिंक्यतारा किल्लाचा समावेश आहे.
माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेच शिवाय हे सर्वात छोटं हिल स्टेशन आहे. मुंबई, पुण्यापासून जवळ असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. सातारा जिल्ह्यातील कास पठार हे देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. यासह अजिंक्यतारा किल्ला, कोयना डॅम, कोयना अभयारण्य या ठिकाणांना देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. कोल्हापुरची महालक्ष्मी अनेकांचे श्रद्धास्थान आहे. रंकाळा तलावामुळे कोल्हापुर चांगलाच प्रसिद्ध आहे.
गणपती पुळे, रत्नदुर्ग किल्ला, आरे वारे बीच, दापोली, श्रीवर्धन, गुहागर हे समुद्र किनारे देखील खूपच सुंदर आहेत. कोकण किनरपट्टीवर वसलेला रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील मोठा टुरिस्ट पॉईंट आहे.