पुणे : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या अनेक राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा इच्छुकांच्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता ठरलेल्या वेळीच 17 जुलै रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहे.
याचिकेद्वारे उमेदवारांनी परीक्षा चार ते सहा आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आता दिल्ली हाय कोर्टानं यावर आपला निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली आहे.
17 जुलै रोजी NEET UG 2022 परीक्षा लेखी पद्धतीने आयोजित होईल. NEET UG 2022 ची परीक्षा भारताबाहेरील 14 शहरांसह देशभरातील 497 शहरांमध्ये घेतली जाईल. यावर्षी 18.72 लाख (18,72,341) उमेदवार NEET UG परीक्षेला बसतील. या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले..