युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबुत येथील फाकटे रस्त्यावरील म्हस्केवस्ती येथे बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वन विभागाला यश आले आहे . गेल्या आठवड्यापुर्वी जोरीवस्ती येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करीत तीला ठार केले होते . या घटनेमुळे येथील ग्रामस्थ संप्तप्त झाले होते त्यामुळे पिंजरा लावण्यात आला होता.
शिरुर तालुक्याच्या बेट भागात या पुर्वीही सचिन जोरी यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार मारले होते. . परंतु वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या कुटुबाला अद्याप नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली नाही . राज्यांचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे , माजी आमदार पोपटराव गावडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी याबाबत वन खात्यांने गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. या भागात १८ पिंजरे लावण्यात आले मात्र बिबट्या गेली आठवडाभर गुंगारा देत होता . गेल्या दोन दिवसा पुर्वी शरदवाडीकडे रस्त्यांने जाणार्यां लोंकावर बिबट्याने हल्ला केला मात्र नशिब बलवत्तर म्हणुन ते बचावले .
बिबट्या जेरबंद केला असला तरी त्याला वन विभाग सोडणार कुठे हा प्रश्न असुन, या पुर्वीही पकडलेले बिबटे वन विभागाने दुसऱ्या भागात सोडल्यांने ते पुन्हा गावात येत असल्यांचा गंभीर आरोप सरपंच दत्तात्रय जोरी यांनी केला आहे . बिबट्या नुसता जनते समोर पकडायचा तो माणिकडोहला नेऊन बिबट्या निवारण केंद्रात सोडतो असे ग्रामस्थांना सांगायचे मात्र बिबट्या निवारण केंद्रात सध्या जागाच उपलब्ध नसल्यांने हे बिबटे जातात कुठे हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.
याबाबत वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, हा बिबट्या सात वर्षाचा असुन, याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे . जे बिबटे हल्ले करणारे नाहीत त्यांनाच जंगलात सोडले जाते . नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे तपासुन त्याची ओळख पटवली जाते . तो असेल तर त्याला निवारण केंद्रात ठेवले जाते .
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकरी वर्ग अवेळी पावसाने वैतागला आहे. त्यात बिबट्यांची दहशत यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या मागणी नूसार बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केली आहे .