Lok Sabha Election : देशात आजपासून लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) च्या ७ पैकी पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. या मतदानामध्ये २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होणार असून त्यात विक्रमी संख्येने मतदान करायला हवे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून करण्यात आले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं…
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2024
आज महाराष्ट्रातही विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणाक आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सकाळी ७ वाजता सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे.