शिक्रापूर : शिक्रापूर येथे मोठ्या गॅस सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करून विक्री केली जात असलेल्या गॅसच्या दुकानांत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली.
दौलत नरसिंग इंचरे व शिवराज सनमुख खानापुरे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात काही इसम गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशी व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तळपे, पोलीस शिपाई प्रकाश झेंडे यांनी शिक्रापूर येथे येत सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी साई गॅस कनेक्शन व रिपेअरिंग दुकानात जाऊन छापा टाकला असता शिवराज खानापुरे तर ओम गॅस एजन्सी या दुकानात दौलत इंचरे हा बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन विक्री करताना मिळून आला.
दरम्यान सदर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तळपे व पोलीस शिपाई प्रकाश बाबासाहेब झेंडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.