पुणे : पुण्यामध्ये समोस्यात कंडोम सापडल्याची घटना ताजी असताना आता बर्फात मेलेला उंदीर आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या राज्यात तापमान चांगलेच वाढले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. या गरमी आणि उकड्यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण विविध शीतपेयांना पसंती देत आहेत. यामध्ये जर तुम्ही बर्फमिश्रीत थंड पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. कारण पुण्यात बर्फाबर्फामध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या जुन्नर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर नागरीकाकांडून संताप व्यक्त केला जात आहे. निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून हा बर्फ जुन्नर आणि इतर परिसरात विक्रीसाठी येतो. हा बर्फ जिथे साठवणूक केली जाते तिथे हा उंदीर बर्फामध्ये आला असल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. तसेच उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला आहे, असे विक्रेत्यांचे म्हटले आहे.