पुणे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांवर, पवना नदीच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
चिंचवडच्या ऐतिहासिक मोरया मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी शिरले. काल रात्री मंदिर पाण्यात बुडाले होते, फक्त घुमटाचा काही भाग दिसत होता. गुरुवारी सकाळपासून पावसाचा वेग मंदावल्याने मंदिराच्या खालच्या पातळीपर्यंत पाणी आले. मात्र अजूनही दर्शन आणि पूजेसाठी अडसर निर्माण होत आहे.
पिंपरी कॅम्प परिसरात पवना नदीच्या काठावर भटनागर झोपडपट्टी परिसरात पाणी शिरले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगण्यात आले आहे. रेट अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
चिखली परिसरातील मोरेवस्ती भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच चेंबर्स जाम झाल्यामुळे तलावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
बुधवारी सकाळपासून पिंपळे गुरव परिसरात पावसाचा जोर वाढला होता. मुसळधार पावसामुळे कृष्णा चौक ते काटेपुरम चौक दरम्यान रस्त्यालगतच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.