नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विजेंदर सिंग यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील मोठ्या संख्येने जागांवर राजकीय प्रभाव असलेल्या जाट समुदायातून विजेंदर सिंग येतात.
जाणून घ्या कोण आहे विजेंदर सिंग:
बॉक्सर विजेंदर कुमारने ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. विजेंदर सिंगचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी हरियाणातील भिवानी येथे झाला. वडिलांचे नाव महिपाल सिंग बेनीवाल. जे हरियाणा रोडवेजमध्ये बस चालक होते. त्यांची आई गृहिणी आहे. विजेंद्र सिंग यांनी आपले प्रारंभिक शिक्षण भिवानी येथूनच पूर्ण केले आहे. त्यांनी भिवानी येथील महाविद्यालयातून पदवी संपादन केली. विजेंद्र सिंगला त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून बॉक्सिंग आणि कुस्तीची आवड होती, तो भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये त्याचा सराव करत असे. त्याने भारतीय बॉक्सिंग प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांच्याकडून कोचिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.