मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आगामी लोकसभेसाठी उमेदवार यादी शनिवारी 30 मार्च रोजी जाहीर करणार आहे. याबाबतची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आर्वीचे विधानसभेचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जणांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत एकूण 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शनिवारी शरद पवार किती उमेदवारांची यादी जाहीर करतात याकडे लक्ष लागले आहे.