पुणे: BCCI चा अध्यक्ष सौरभ गांगुली याला या पदाची दुसरी टर्म नाकारण्यात आली आहे. यावरून क्रिकेट विश्व तसेच, राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे.
अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी या वादात उडी घेतली आहे. ममता यांनी सौरभ गांगुलीसाठी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
सौरव गांगुलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केले आहे. सौरव गांगुलीला आयसीसीची निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती ममता यांनी पंतप्रधानांना केले आहे.
आयसीसी अध्यक्षपदासाठीही निवडणूक होत आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी २० ऑक्टोबरला नामांकन दाखल केले जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो, अशी चर्चा होती.
“मी पंतप्रधानांना विनंती करते की सौरव गांगुलीला आयसीसीची निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी. तो एक लोकप्रिय व्यक्ती आहे, म्हणून त्याच्यासोबत असा भेदभाव केला जात आहे”असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.