मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला ‘मोक्का’च्या कारवाईतून वाचवलं असे अजित पवार यांनी म्हटले. फक्त एकच वेळ वाचवा असं सांगितल्यामुळे आपण त्यांना वाचवलले, असे अजित पवार म्हणाले. मात्र आता याच मुद्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ‘दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला.’ कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते हे दादांनी स्वत: सांगितलं, अशा खोचक शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर मी दादांवर टीका केली नाही, त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचे कौतुक केले, अशा शालजोडीतला टोमणाही आव्हाड यांनी मारला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ट्विटरवरू एक व्हिडीओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर करत म्हटले की, ”दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. २५ हजार कोटीचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधाऱ्यांकडून हे देखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, काय दुर्दैवं आहे. आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेपण आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते, हे सगळं दादा आपल्या तोंडून सांगून गेले. म्हणजे पोलिसांकडून मोक्कासुद्धा गरीबालाच लागतो आणि ज्याचा राजकीय वशिला असतो, त्याला सोडून देतात. इन्कमटॅक्सच्या धाडी कोणावर पडतात, हे मला माहित नाही; पण, २५ हजार कोटीचा आयकर माफ होऊ शकतो, हे तर आश्चर्यकारकच आहे. पण असो, दादांच्या शब्दांतून येथील कारभार कसा उत्तमरित्या सुरू आहे याची “गॅरंटी” देण्यात आली. तसेच आता दादां वर मी टीका केली नाही. त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचे कौतुक केले”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. २५ हजार कोटीचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधाऱ्यांकडून हेदेखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, सालं काय दुर्दैवं आहे… आमच्यावर दाखल… pic.twitter.com/LvQgcXzvl5
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 15, 2024
;