कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तृणमूल काँग्रेसने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचेही फोटोमध्ये दिसत आहे. कालीघाट येथील घरी ममता जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा त्या ट्रेडमिलवर व्यायाम करत होत्या, तेव्हा ही घटना घडली. यामध्ये ममता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ममता या त्यांच्या घरी ट्रेडमिल वापरत असताना पडल्या. यानंतर त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. सध्या ममता यांच्यावर उपचार सुरू झाले असून त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अपडेट अपेक्षित आहे.
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
Please keep her in your prayers ???????? pic.twitter.com/gqLqWm1HwE— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024