पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पाटबंधारे विभाग, जळगाव येथे विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पाटबंधारे विभाग, जळगाव येथे अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, गिरणा भवन, आकाशवाणी स्टेशन समोर, एअर स्टेशन चौक, जळगाव येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अभियंता.
– एकूण रिक्त पदे : 25 पदे.
– नोकरीचे ठिकाण : जळगाव.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2024.