पुणे : अभिनेता अमिर खान पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्याच्या नव्या जाहीरातीवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे.मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीवरुन नेटिझन्सकडून चांगलचं ट्रोल केल्या जात आहे.
या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू संस्कृती आणि परंपरा दुखावल्या गेल्याचा आरोप नेटिझन्सकडून केल्या जात आहे. तरी आता या जाहिरातीच्या वादात काही राजकीय नेते मंडळींसह बॉलिवुडमधील काही अभिनेत्यांनी यांत उडी घेतली असुन आता हा वाद आणखीचं चिघळणार असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या जाहीरातीमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि कियारा अडवाणी आहेत. खान यांनी भारतीय परंपरा आणि प्रथा लक्षात घेऊन अशा जाहिराती करू नयेत, असे वक्तव्य करत मिश्रा यांनी अभिनेता मिर खानवर टिका केली आहे. या जाहिरातीतून अभिनेता अमिर खानने हिंदु धर्माचा आणि संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप अमिर खानवर केल्या जात आहे.
गेल्या महिन्यात अमिर खानचा लाल सिंह चड्डा हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण बायकॉट ट्रेण्डमुळे तो बॉक्स ऑफिसवर चांगलाचं आपटला. आता अमिर खानच्या एका जाहिरातीवरुन वाद शिगेला पेटण्याची शक्यता आहे कारण अभिनेत्यास या जाहिरातीवरुन नेटिझन्सकडून चांगलचं ट्रोल केल्या जात आहे. एयु स्माल फायनान्स या बॅकेची ही जाहिरात असुन या जाहिरातीत अभिनेत्री कियारा अडवाणी यात अमिर खान बरोबर दिसुन येत आहे.
एयू स्माल फायनान्स या बॅकची 50 सेकंदांची जाहिरात नुकतीचं प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीत अभिनेता अमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे नवविवाहित जोडपे म्हणून लग्न समारंभानंतर त्यांच्या घरी जात असल्याचे दाखवले आहे.
“बिदाई” म्हणून ओळखल्या जाणार्या – त्यांच्या लग्नानंतरच्या समारंभात दोघांपैकी कोणीही कसे रडले नाही याबद्दल चर्चा करताना हे जोडपे दिसत आहे. त्यानंतर या जाहिरातीमध्ये अभिनेता अमिर खान आपल्या बायकोच्या घरात म्हणजेचं आपल्या सासरी राहायला जातो असं या जाहिरातीत दाखवलं गेलं आहे. हिंदु संस्कृती प्रमाणे मुलगी मुलाच्या घरी बिदा होवू म्हणजे सासरी राहण्यास जाते पण या जाहिरातील मात्र वर वधुच्या घरी राहायला जातो. पण यावरुनच अभिनेता अमिर खानवर टिकेची झोड उठवल्या जात आहे