यवत: केडगाव येथील गॅस दुकानातून 10 सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली. मंगळवारी (12 मार्च) रात्रीच्या सुमारास रिलायन्स कंपनीच्या गॅस एजन्सीचे शटर फोडून दुकानात असलेल्या 11 हजार 670 रुपये किंमतीच्या 10 गॅस सिलेंडरची अज्ञात व्यक्तींनी चोरी केली. याबाबत गॅस एजन्सीचे विजय भानुदास अडागळे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोनवणे हे तपास करीत आहेत.