पुणे : पुण्यातील घोरपडी येथे राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच खर्चासाठी वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरुपात पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील नाराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑगस्ट 2018 पासून 11 मार्च 2024 या कालावधीत खराडी बायपास आणि अहमदनगर या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.11) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सचिन कल्याण वरठे (वय-40 रा. इंदिरानगर, शेवगाव, ता. शेवगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी सचिन वरठे याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून खर्चासाठी वेळोवेळी रोख आणि आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे घेतले. तसेच तरुणीला खराडी बायपास आणि अहमदनगर येथे घेऊन जात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.