लोणी काळभोर (पुणे) य़शवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उरुळी कांचन-शिंदवने या गट क्रमांत एकमध्ये “शेतकरी विकास आघाडी” चे सुशांत सुनिल दरेकर, संतोष आबासाहेब कांचन व सुनिल सुभाष कांचन हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तर रयत सहकारी पॅनेलच्या अजिंक्य महादेव कांचन, अमित भाऊसाहेब कांचन, विकास विलास आतकीरे या तीनही उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात आज रविवारी (ता. १०) सकाळपासुन सुरु आहे. या निवडणुकीतील सर्वात पहिला सकाळीच निकाल हाती आला होता. यामध्ये कारखान्याच्या ब वर्गात आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेल चे उमेदवार सागर अशोक काळभोर हे २०२ मतांनी विजयी झाले आहेत.
दरम्यान, हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल”,तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या दोन पॅनलपैकी कोणता पॅनल आज या निवडणुकीत बाजी मारेलयाची उत्सुकता मोठ्या प्रमानात तानली गेली होती. यात गट क्रमाक एकमधुन “शेतकरी विकास आघाडी” च्या तीनही उमेदवारांनी बाजी मारुन, कारखान्यावर सत्ता मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
दरम्यान, संतोष आबासाहेब कांचन यांना सर्वाधिक ५६७० मत् मिळाली असुन, त्यांच्या खालोखाल सुनिल सुभाष कांचन यांना ५४९६ मते तर याच पॅनलचे तीसरे उमेदवार सुशांत सुनिल दरेकर यांना ५०८० एवढी मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे पराभुत उमेदवारांच्या पैकी विकास विलास आतकिरे यांना सर्वाधिक ४८६५ तर दुसरे पराभुत अजिंक्य महादेव कांचन यांना ४४९७ मते तर तिसरे उमेदवार अमित भाऊसाहेब कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.