यवत : खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर प्रेझेंटेशन आणि मॉडेल तयार केले होते.
महाविद्यालयात विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. त्यामध्ये पर्यावरण पूरक, भौगोलिक, गणितीय, रासायनिक अभिक्रिया या संदर्भातील विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सदर उपक्रमांच्या विविधतेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार दिसून आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अभिजीत सोनोणे त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि विज्ञान दिवस का साजरा केला जातो, याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, सचिव सूर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात, प्राचार्य डॉ. रेखा साळुंखे, प्रा.विकास धुमाळ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा.अर्चना मेमाणे, प्रा. दीप्ती सातव, प्रा. काजल थोरात, प्रा. सायल सय्यद आणि प्रा. स्नेहा लव्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे प्राध्यापक अमोल चोरमले यांनी आभार व्यक्त केले.