बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरडी गावात मोबाईल रेंज आणि टॉवर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशाराच नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, सुरडी गावात आजतागायत एकही टावर उभा नाही. यामुळे मोबाईल असूनही रेंज नसल्याने ग्रामस्थांचे अनेक कामे खोळंबली जात आहेत. यामुळे आता सुरडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्येच मंजूर करून घेतला आहे.
इंटरनेट आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल ही अतिशय जवळची वस्तू मनाली जात आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासह इंटरनेटच्या या जगात, कुठं काय सुरू आहे, हे मोबाईल वरूनच माहिती मिळते. मात्र तोच मोबाईल गावात आल्यावर काम करत नाही. यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत या मोबाईलची रेंज डोकेदुखी बनली आहे. तर ही रेंज मिळवण्यासाठी गावात टॉवर उभाराव यासाठी गेल्या २० वर्षापासून ग्रामस्थ पुरावा करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत टॉवर उभा करण्यात आलं नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून थेट लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सुरेश धस आहेत. हे दोघेही सत्ताधारी पक्षातील आहेत. मात्र हे दोन आमदार नावाला आणि एकही नाही कामाला, अशी चर्चा गावात सुरू आहे.