मुंबई: विशेष तपास पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दोषारोप ठेवत 137 कोटींचा दंड ठोठावला होता. आता या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरविला आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईला स्थगिती दिली आहे.